मुंबई क्राईम न्यूज भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांची पत्नी गौरी गर्जे यांनी गुरुवारी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनंत गर्जे (Anant Garje) यांचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते. यामुळे अनंत गर्जे आणि गौरी गर्जे यांच्यात अनेकदा भांडणं व्हायची. या सगळ्यामुळे  केईएम रुग्णालयातील दंतवैद्यक विभागात डॉक्टर असलेल्या गौरी गर्जे (Gauri Garje) प्रचंड तणावात होत्या. याच तणावातून गौरी गर्जे यांनी आत्महत्या (Suicide news) केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गौरी गर्जे यांच्या आत्महत्येनंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे पीए अनंत गर्जे हे फरार असल्याची माहिती आहे. वरळी पोलिसांनी याप्रकरणी चौकशीला सुरुवात असली तरी अद्याप अनंत गर्जे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

या सगळ्या प्रकारानंतर गौरी गर्जे  यांच्या मामांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, दोन महिन्यांपासून गौरी आणि तिच्या नवऱ्याचा वाद सुरु होता. गौरीला आपल्या नवऱ्याचे अनैतिक संबंध असल्याचे समजले होते. मात्र, तिने त्याला माफ केले होते. मात्र, तरीही अनंत गर्जे यांनी त्या महिलेशी चॅटिंग सुरु ठेवले होते. अनंत गर्जे गौरीला खूप टॉर्चर करत होता. यावरुन दोघांमध्ये भांडण झाले तेव्हा, अनंत गर्जे यांनी स्वत:च्या हातावर वार केले आणि म्हणाला, मी पण मरेन आणि तुला पण गुंतवेन. गौरी डॉक्टर होती, लढाऊ मुलगी होती, ती कधीच आत्महत्या करणार नाही, असे गौरी गर्जे पालवे यांच्या मामांनी सांगितले.

गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांचा विवाह झाला होता. त्यावेळी गौरीच्या घरच्यांनी लग्नासाठी 50 ते 60 लाख रुपये खर्च केला होता. बीडमध्ये (Beed news) हे लग्न झाले होते. त्यावेळी पंकजा मुंडेही या लग्नाला आल्या होत्या. लग्नानंतर गौरी यांना नवऱ्याच्या अनैतिक संबंधांविषयी समजले. तिने ही गोष्ट घरच्यांना सांगितली. पण नातेवाईकांना काय म्हणायचं, असं सांगत गौरी यांच्या आई-वडिलांनी पुढे काही करण्यात टाळाटाळ केली. गौरीच्या वडिलांकडे अनंत गर्जे यांच्या आणि दुसर्‍या महिलेल्या चॅटिंगचे पुरावे आहेत. गौरीने गळफास घेतला, माझ्यासमोर आत्महत्या केली, असे अनंत गर्जे यांनी पोलिसांना सांगितले. मग त्यांनी तिला आत्महत्या करताना थांबवले नाही का? गौरीने आत्महत्या केली तर मग अनंत गर्जे का पळाले, असा सवालही गौरी पालवे हिच्या मामांनी उपस्थित केला. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणात अनंत गर्जे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या डॉक्टर पत्नीने टोकाचं पाऊल उचललं, मुंबईत जीवन संपवलं

आणखी वाचा

Read more
घरच्या मैदानावर लखनऊ सुपर जायंट्सचा लाजिरवाणा पराभव; दिल्ली कॅपिटल्सची विजयी सलामी
Marathi
RCB ते CSK सर्व 10 संघांनी पहिला सामना खेळला, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्याच 5 दिवसात मोठा ट्विस्ट
Marathi
लखनऊच्या नवाबांची घरच्याच मैदानात शिकार! दिल्ली कॅपिटल्सची विजयी सलामी, Points Table मध्ये उघडल
Marathi
IPL 2026 – समीर रिजवी-ट्रिस्टन स्टब्स यांनी लखनऊचा परफेक्ट कार्यक्रम केला, दिल्लीचा 6 विकेटने दमदार विजय
Marathi
कोणत्या कंपनीची कार सेवा सर्वोत्तम आहे? लोकप्रिय कारची सेवा किंमत जाणून घ्या
Marathi
आयआरजीसीच्या धमक्यांनंतर इराणने बहरीनमधील ॲमेझॉन क्लाउड युनिट्सवर हल्ला केला, संपूर्ण पश्चिम आशियामध्ये AWS सेवा विस्कळीत झाली
Marathi
पुण्यातील बिल्डर चोरडिया बंधूंचा प्रताप, बंगल्यासमोरील गरिबांच्या हातगाड्या नकोशा, कोरेगाव पार्कमध्ये एका रात्रीत 'अख्खं गार्डन' उगवलं
Abplive
1 एप्रिलपासून बदलणार लोनचे 'हे' 4 नियम, 'हे' शुल्क भरावे लागणार नाही
Newspoint
महाराष्ट्रात प्रवास महाग झाला, द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवर टोल दरात वाढ
Newspoint
सोलापूरकरांसाठी खुशखबर! सोलापूर-हैदराबाद विमानसेवेचे आजपासून बुकिंग, १७ एप्रिलला पहिले उड्डाण; तिरुपती विमानसेवा कधी? वाचा...
Newspoint